निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीच्या कार्याची दखल; लक्ष्मण शिंदे यांना ‘हिंदूरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान


कापूरहोळ

निसर्ग संवर्धन, पर्यावरण जनजागृती आणि निसर्ग कवितांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे माळेगावं, नसरापूर ता भोर सेवानिवृत्त वनविभागीय लेखापाल व निसर्गकवी लक्ष्मण शिंदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील संकल्प बँक्वेट हॉल, शास्त्री रोड, नवी पेठ येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्रामोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र दर्जा) रवींद्र साठे आणि डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते लक्ष्मण शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या विविध भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. निसर्गाचे संवर्धन, पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती तसेच निसर्ग कवितांच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी शिंदे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

निसर्गासाठीच्या कार्याला मिळाली नवी ऊर्जा!

या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना लक्ष्मण शिंदे यांनी हा पुरस्कार आपल्या आजवरच्या कार्याची पोहोच पावती असल्याचे सांगितले. निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्य यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्यासाठी हा पुरस्कार नवी प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही निसर्ग संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनासाठी योगदान देणाऱ्या लक्ष्मण शिंदे यांच्या कार्याचे या पुरस्काराच्या माध्यमातून विशेष कौतुक होत आहे.


20
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!