धांगवडीत भरदिवसा घरफोडी; ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास!


कापूरहोळ

धांगवडी ता. भोर येथे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) घडली. संतोष रामचंद्र वीटकर यांच्या घरी ही चोरी झाली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वीटकर आणि त्यांची पत्नी नीलम हे दोघेही कामानिमित्त पुरंदर तालुक्यातील कांदळी येथे गेले होते. त्यांची दोन्ही मुले शाळेत गेली होती. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे नुकसान करून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील शोकेसच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे एक तोळा वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, तसेच प्रत्येकी अंदाजे दोन ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील कर्ण फुले आणि १० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, असा एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी संतोष वीटकर यांनी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

या घरफोडीचा तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


20
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!