वेळू पुलावर दुचाकी अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


कापूरहोळ

वेळू तालुका भोर येथील उड्डाणं पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात शेखर सोमनाथ बागले (वय ४५, रा. लक्ष्मी विष्णू पार्क, फ्लॅट नं. ५०२, आंबेगाव खुर्द, पुणे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बागले हे पुणे-सातारा महामार्गावरून दुचाकी क्रमांक एमएच १२ झेडडी ९५३७ वरून प्रवास करीत होते. वेळू, ता. भोर येथील पुलावर आल्यानंतर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी पुलाला धडकून ते पुलावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या अपघातात शेखर बागले यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा कृष्णा शेखर बागले यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलिस करीत आहेत.


20
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!