कापूरहोळ
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नसरापूर येथील राजतोरण सभागृह मध्ये फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भोर, कापूरहोळ व नसरापूर परिसरातील केमिस्ट व फार्मासिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एमएससीडीए पश्चिम विभागाचे सेक्रेटरी राहुल देशपांडे, भोर तालुका उपाध्यक्ष मोहन देशमुख, महेश इंगुळकर यांच्यासह परिसरातील केमिस्ट व फार्मासिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकतीच फार्मासिस्ट झालेल्या तन्वी शेटे यांच्या हस्ते केक कापून जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित फार्मासिस्टांनी एकमेकांना शुभेच्छा देत फार्मसी क्षेत्रातील योगदान आणि रुग्णसेवेतील फार्मासिस्टची भूमिका याबाबत संवाद साधला.
कार्यक्रमाचे स्वागत मोहन देशमुख यांनी केले, तर अनिकेत सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. परिसरातील केमिस्ट व फार्मासिस्टच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.














