ब्रिटिशकालीन पुल मृत्यूचा सापळा!


कापूरहोळ :

नसरापूर–वेल्हा (राजगड) मार्गावर शिवगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा ठरत असून, या पुलावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सातारा महामार्गाला राजगड तालुक्याशी जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर नवीन प्रशस्त पूल उभारण्याची गरज आहे.

शंभर वर्षांपूर्वीच्या गरजा लक्षात घेऊन बांधण्यात आलेला हा पूल आजच्या वाहनसंख्येसमोर तोकडा पडत आहे. पुल इतका अरुंद आहे की दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर एकाला थांबावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे.

या पुलावर कायमच मोठमोठे खड्डे पडत असून पावसाळ्यात पुराचे पाणी येण्याचा धोका वाढतो त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

महामार्गापासून वेल्हा राजगड तालुक्याला जोडणारा हा प्रमुख दुवा असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाला पर्याय देण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होत नसल्याची टीका होत आहे. आगामी काळातील वाहतूक आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन, रुंद आणि सुरक्षित पुलाचे नियोजन करण्याऐवजी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नवीन पुलाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा स्पष्ट इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार, की त्याआधीच सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलणार?असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

नसरापूर येथील गुंजवणी नदीवरील दगडी पूल हा भोर तालुक्याच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या पुलाच्या बांधकामाची रचना, बांधकाम शैली आणि तत्कालीन रस्ते विकास पाहता हा पूल ब्रिटिश राजवटीच्या उत्तरार्धात बांधला गेला असावा, असे इतिहास अभ्यासक मानतात.

पुणे–कोकणचा महत्त्वाचा दुवा

ब्रिटिश काळात पुणे–नसरापूर–भोर–वरंधा घाट–महाड हा मार्ग कोकणाशी संपर्क साधणारा प्रमुख व्यापारी आणि प्रशासकीय मार्ग होता. या मार्गावरून धान्य, गूळ, भात, फळे, लाकूड आणि इतर मालाची वाहतूक होत असे. अधिकारी, टपाल आणि लष्करी तुकड्यांचीही या मार्गावरून नियमित ये-जा होत असे.

अभियांत्रिकीची उत्कृष्ट कलाकृती

हा पूल काळ्या दगडात आणि चुन्याच्या गिलाव्याने बांधलेला कमानी (Stone Arch) प्रकारचा आहे. कमानींच्या रचनेमुळे नदीच्या पुराचे पाणी सहज वाहून जाते आणि पुलावरचा ताण कमी होतो. त्यामुळे शंभर वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही ब्रिटिशकालीन दगडी पूल उभा आहे स्थानिक जीवनातील या पुलाचे योगदान मोठे आहे.


20
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!