केळवडे वि. का. सेवा संस्थेच्या चेअरमन पदी विजय जगन्नाथ कोंडे


कापूरहोळ

पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील केळवडे विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी, लि. केळवडे या संस्थेचे चेअरमन नारायण आनंदराव कोंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमनपदी विजय जगन्नाथ कोंडे यांची चेअरमन पदी सर्वानुमतें बिनविरोध निवड करण्यात आली.

दि.18/०9/२०25 रोजी.ही निवडणूक घेण्यात आली होती.सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन संजय पवार यांनी कामकाज पाहिले.तसेच सहाय्यक म्हणुन संस्थेचे सचिव अभिजित काकडे आणि संपतराव जगताप यांनी काम पाहिले.

निवड प्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक . शिवनाना कोंडे, अशोकराव कोंडे, बाळासाहेब कोंडे, बाळासाहेब जायगुडे, राजेंद्र कोंडे, दादा माने, राजुआपा कोंडे,रंजना धुमाळ, व्हा. चेअरमन सुरेखा कोंडे, पांडुरंग कोंडे, यांचे सह सभासद उपस्थित होते.

निवडणूकी नंतर नवनियुक्त चेअरमन विजय कोंडे यांचा सत्कार बाळासाहेब भिकोबा कोंडे यांनी केला तसेच नारायण काका कोंडे यांनी सर्वांचे आभार मानले

सत्कार समयी चेअरमन विजय कोंडे म्हणाले की,आगामी काळात संस्थेच्या सभासदांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असून संस्थेच्या विकासात सर्वांना सहभागी करुन घेण्यात येईल.तसेच शंबर टक्के कर्ज वसुलीचे उद्दिस्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

 


21
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!