पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुक मतदार ठरावासाठी जोरदार रस्सी खेच


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सहकारी संस्थांच्या मतदारयादीत समावेश होण्यासाठी ठराव प्रक्रिया 22 सप्टेंबर रोजी संपत असून आपल्याच कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून रणसंग्राम रंगला आहे जिल्ह्यातील प्रस्थापित मंत्री व आमदार व विद्यमान संचालक यांनी बँकेवर जाण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून महाविकास आघाडी व भाजपची भूमिका जाहीर झाल्यानंतर राजकारण उफाळून येणार आहे.

निवडणुकीसाठी ९ हजार २९६ मतदार

सोसायटी ‘अ’ वर्ग मतदार १३७७आहेत. ‘ब’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या १६१, ‘क’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या १७११ आणि ‘ड’ वर्गातील एकूण पात्र संस्थांची संख्या ४ हजार ३६८ असून सद्यःस्थितीत संस्था सभासद संख्या ७ हजार ६१७ आणि व्यक्ती सभासद १ हजार ६७९ असे एकूण सभासद ९ हजार २९६ मतदार आहेत मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार

२१ जागांचे संचालक मंडळ असणार

अ वर्ग तालुका गट विकास सोसायटी मतदारसंघातून जिल्ह्यातील १३ तालुक्यांतून प्रत्येकी एक उमेदवार असणार आहे, ब वर्गातून १ उमेदवार असून कृषी पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया, खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाने यांचा समावेश आहे, क वर्गातून १ जागा आहे त्यामध्ये नागरी सहकारी बँक व पतसंस्थांचा समावेश आहे, ड वर्गातून १ संचालक आहे. त्यामध्ये ग्राहक संस्था पाणीपुरवठा, गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक उत्पादन संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था, सर्वसाधारण संस्था, दुग्ध संस्था, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन प्रतिनिधी व व्यक्ती सभासदांचा समावेश आहे, पाच जागा राखीव आहेत यामध्ये अनुसूचित जाती-जमातीं १, इतर मागासवर्गीय १, विमुक्त जाती-भटक्या जमाती १, महिला प्रतिनिधी २ असे एकूण २१ संचालक निवडले जाणार आहेत.

सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हाच्या राजकारणात बँक महत्त्वपूर्ण मानली जाते या बँकेच्या माध्यमातूनच अनेकांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालीच गेली ३० वर्षे संचालक मंडळ कार्यरत होते. पवार यांनीही आपले राज्यातील राजकीय पदार्पण बँकेच्या माध्यमातूनच केले होते त्यांच्या निधनानंतर मात्र आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बँकेत लक्ष केंद्रित केले आहे.


2
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

error: Content is protected !!